गरिबी निर्मूलनासाठी ओबामांनी लढावे- मंडेला

वर्णद्वेषाविरोधात अनेक दशकं लढा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बराक ओबामांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांनी आता गरिबी विरोधात लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या संदर्भात मंडेला यांनी ओबामांना एक पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी ओबामांना अनेक सल्ले दिले आहेत. अमेरिकी राष्ट्रध्यक्षपदी ओबामां प्रमाणे एका कृष्णवर्णीय व्यक्तीची निवड होणे कौतुकास्पद असल्याचेही मंडेला यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा