ओबामांचा विजय ऐतिहासिकः डॉ.मनमोहन सिंह

भाषा

बुधवार, 5 नोव्हेंबर 2008 (16:18 IST)
बराक हुसैन ओबामा यांचा विजय असाधारण असून एका दूरदृष्‍टी असलेल्‍या नेत्‍याचा हा विजय भारत आणि अमेरिकेसाठी फलदायी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी दिली आहे.

एका अश्‍वेत व्‍यक्‍तीचा 'व्‍हाईट हाऊस'पर्यंतचा प्रवास केवळ अमेरिकेतीलच नव्‍हे तर जगभरातील लोकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, अशा शब्‍दात त्‍यांनी ओबामांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

भारत आणि अमेरिकेतील जनता स्‍वातंत्र्य, एकता, मानवी अधिकार आणि लोकशाहीची उपासक असून दोन्‍ही देशांतील मैत्रीची हीच मेख असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा