Budget 2024: या अर्थसंकल्पीय घोषणेने काँग्रेस खूश अर्थमंत्र्यांनी वाचला आमचा जाहीरनामा म्हणाले

मंगळवार, 23 जुलै 2024 (14:13 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत 2024 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता, त्यामुळे लोकांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. अर्थसंकल्पातील घोषणांवर विविध पक्षांचे नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात एक अशी घोषणा झाली आहे, ज्याचा काँग्रेस पक्ष खूप आनंदात आहे. काँग्रेसने तर अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा वाचल्याचे म्हटले आहे. 
 
मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत तरुणांना इंटर्नशिपसह 5,000 रुपये मासिक भत्ता मिळेल. अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकार एक महिन्याचे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) योगदान देऊन नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या 30 लाख तरुणांना प्रोत्साहन देण्यात येईल. 
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणुकीच्या निकालानंतर मुख्य विरोधी पक्षाचा जाहीरनामा वाचून दाखवला याचा मला आनंद आहे. चिदंबरम म्हणाले की, सरकारने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) स्वीकारले आहे. 

काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, 10 वर्षांच्या नकारानंतर केंद्र सरकारने हे मान्य केले आहे की बेरोजगारी हे राष्ट्रीय संकट आहे ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती