इमिटेशन दागिने
कस्टम ड्युटी कमी केली
अर्थसंकल्पात सरकारने रत्ने आणि दागिन्यांवर कस्टम ड्युटी कमी केली आहे. कस्टम ड्युटीमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीही सरकारने कमी केली आहे. त्यातही 5 टक्के कपात करण्यात आली आहे. स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मेंथा तेलावरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली आहे.
ज्या वस्तूंवर सीमाशुल्क वाढवले
सीमाशुल्क वाढीबाबत बोलायचे तर या अर्थसंकल्पात भांडवली वस्तूंवरील सीमाशुल्क आणि आयात शुल्क 7.5 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय इमिटेशन ज्वेलरीवरही कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. परदेशी छत्र्यांच्या किमतीही वाढणार आहेत. मिश्रित नसलेल्या इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत.