आपल्या गंभीर अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या अदाकारी मीना कुमारी त्यांच्या रील लाईफमध्ये 'ट्रेजडी क्वीन' नावाने प्रसिद्ध होत्या. पण खऱ्या आयुष्यात त्या सहा नावांनी ओळखल्या जायच्या. मुंबईमध्ये 1 ऑगस्ट 1932 ला एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबामध्ये मीना कुमारी यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव 'माहजबी' ठेवले होते.