थ्री इडियट्स चित्रपटात टॉप करणार्या आमिर खानने रिअल लाईफमध्ये शाळेनंतर शिक्षण सोडून दिलं. आमिरने नर्सी कॉलेजातून हायर सेकंडरी केलं पण तो शाळेत कमीच जायचा. त्यांचं पूर्ण लक्ष चित्रपट पाहण्यात आणि ऍक्टींगकडे असायचं. यानंतर त्याने पुढे शिक्षण करण्याबद्दल विचारच केला नाही आणि सिनेसृष्टीत करियरची सुरुवात केली.
आपल्या तरुणपणात करीनाची वकील बनण्याची इच्छा होती. यासाठी तिने मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता पण हिंदी सिनेसृष्टीत गाजलेल्या कपूर घराण्यात राहून तिचं सिनेमाशी दूर राहणं शक्य नव्हतं. एका वर्षानंतरच तिने हा कोर्स सोडून ऍक्टींग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या प्रकारे करीनाने रिफ्यूजी या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं आणि नेहमीकरता शिक्षण सोडून दिलं.