एका कुस्तीपटूनं सांगितलं की, समितीच्या एका सदस्यांनी तिला बृजभूषण सिंह हे वडीलधारे व्यक्ती आहेत आणि तिने त्यांच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावला आहे, त्यांनी निष्पापणे केलेल्या कृतीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं म्हटलं आहे.
दुसऱ्या एका कुस्तीपटूने सांगितलं की, सिंह यांच्या जवळचे मानले जाणारे कुस्ती महासंघातील पदाधिकारी तसंच प्रशिक्षक चौकशीच्या वेळेस स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडियाच्या वेटिंग एरिआमध्ये गर्दी करून होते. ही कृती आम्हाला भीती दाखवणारी होती.