महिला खेळाडूना शर्ट, ट्राऊजर आणि ब्लेझर असा पेहराव

बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:35 IST)
आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या महिला खेळाडू पारंपरिक साडीऐवजी पुरुष खेळाडूंसारख्या शर्ट, ट्राऊजर आणि ब्लेझर अशा पेहरावात दिसतील. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं त्या पार्श्वभूमीवर अॅथलीट कमिशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सदरचा  निर्णय घेतला आहे.

भारतीय पथकातल्या मुली वेगवेगळ्या वयोगटाच्या असतात. त्या सगळ्याच मुलींना साडी नेसणं जमतं असं नाही. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याआधी एकमेकींना तयार करण्यासाठी मुलींना भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यानंतरही उद्घाटन सोहळ्याच्या संचलनात चार-पाच तास साडी नेसून वावरणं मुलींना सोयीचं नसतं, असं म्हटलं जात आहे. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन 4 ते 15 एप्रिल या कालावधीत ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये करण्यात आलं आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती