U17 World Championships: भारताला मिळाले पाचवे सुवर्ण पदक, महिला कुस्तीपटू काजलने सुवर्णपदक जिंकले

शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (16:00 IST)
social media
अम्मानमधील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी काजल ही देशातील पाचवी कुस्तीपटू ठरली असून अंडर-17 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटात भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काजलने शुक्रवारी 69 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओलेक्झांडर रायबॅकचा 9-2 असा निर्णायक पराभव केला. मात्र, आणखी एक भारतीय श्रुतिकाला46 किलो गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या यू कात्सुमेचे आव्हान पेलता आले नाही आणि तिला अवघ्या 40 सेकंदात पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
 
आणखी एक भारतीय कुस्तीपटू राज बालाने 40 किलो वजनी गटात जपानच्या मोनाका उमेकावाचा 11-5 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले, तर मुस्कानने 53 किलो वजनी गटात अमेरिकेच्या इसाबेला गोन्झालेसला तांत्रिक श्रेष्ठतेने पराभूत करून कांस्यपदक जिंकले.मात्र, रजनीताला 61 किलो वजनी गटाच्या ब्राँझ मेडल प्लेऑफमध्ये अझरबैजानच्या हियुनाई हुरबानोव्हाकडून पराभव पत्करावा लागला

भारतीय महिला कुस्तीपटूंनी पाच सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह आठ पदकांसह त्यांच्या मोहिमेची सांगता केली. यापूर्वी भारतासाठी आदिती कुमारी (43 किलो), नेहा (57 किलो), पुलकित (65 किलो) आणि मानसी लाथेर (73 किलो) यांनी शनिवारी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते.
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती