बॉक्सर पूजा राणीने तिच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. महिलांच्या मिडिलवेट (69-75 किलो) स्पर्धेत तिने अल्जेरियाच्या इच्राक चैब ला 5-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पटकावले. या विजयासह ती टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरी गाठणारी दुसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे.