स्नूकर आणि बिलियर्ड्स खेळाडू पंकज आडवाणी कोरोनाच्या विळख्यात, स्वतःला आयसोलेट केले

मंगळवार, 11 जानेवारी 2022 (20:32 IST)
दिग्गज स्नूकर आणि बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी देखील कोविड-19 च्या विळख्यात आले आहेत. 23 वेळा विश्वविजेता ठरलेल्या पंकजने सोमवारी ट्विट करून स्वतःला संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. अडवाणी म्हणाले, 'मला कोविड 19 ची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मला थंडी  आणि ताप जाणवत आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्वतःची  तपासणी  करावी. मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. कृपया सुरक्षित रहा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.
या चॅम्पियन खेळाडूने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भोपाळ येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय बिलियर्ड्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच हे त्यांचे  एकूण 11 वे राष्ट्रीय विजेतेपद होते. या विजयानंतर अडवाणी आयबीएसएफ वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिपच्या तयारीत व्यस्त होते. पण कोरोनाच्या वाढत्या केसमुळे ही स्पर्धा मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती