इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये 2022 ला होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकूल स्पर्धा समितीने राष्ट्रकूल स्पर्धेत महिला टी 20 स्पर्धेचा समावेश केल्याची घोषणा केली. 1998 ला राष्ट्रकूल स्पर्धेत पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा समावेश केला होता. त्यानंतर 24 वर्षांनी महिला क्रिकेट टी 20 स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रकूल स्पर्धेत एजबेस्टन मैदानावर आठ दिवस आठ संघ राष्ट्रकूल स्पर्धेत खेळणार आहेत. राष्ट्रकूल स्पर्धेत पहिल्यांदाच महिला टी 20 स्पर्धेचा समावाश करण्यात आला आहे. 2022 ची राष्ट्रकूल स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. या स्पर्धेत 4 हजार 500 खेळाडू 18 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. राष्ट्रकूल स्पर्धेत महिला टी 20 क्रिकेट स्पर्धेचा समावेश केला असला तरी या स्पर्धेतून भारताला सर्वाधिक पदके मिळवून देणारा नेमबाजी क्रीडा प्रकार वगळण्यात आला आहे.