सायना म्हणाली, नवी दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकतक्त्यात भारत दुसर्या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक होता आणि भारताने 99 पदके जिंकली होती. शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषसंघाची अंतिम लढत आणि बॅडमिंटन महिला एकेरीची अंतिम लढत होती.
मी सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी संघाने रौप्यपदक. सुवर्णपदक जिंकून शंभरावे पदक भारताच्या खात्यात जमा करू शकले, याचा आनंद आहे.' त्या वेळी सायना अवघ्या 20 वर्षांची होती. त्या वेळी ती राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.