सिंधूची रँकिंगमध्ये घसरण, दोन वरून पाचव्या क्रमांकावर आली

शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (14:58 IST)
नुकतेच आपल्या करिअरचे सर्वश्रेष्ठ आणि जागतिक दुसर्‍या नंबरची रँकिंग मिळवणारी भारतीय स्टार महिला शटलर पीवी सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)चे गुरुवारी काढण्यात आलेल्या रँकिंगमध्ये तिसर्‍या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे.  
 
हैदराबादची 21 वर्षीय सिंधू मागच्या आठवड्यात मलेशिया ओपन सुपर सीरीजच्या पहिल्या राउंडमध्ये पराभूत होऊन टूर्नामेंटमधून बाहेर झाली होती, ज्यामुळे तिचे क्रमांक घसरले आहे.  
 
तसेच ऑलिंपिकची कांस्य पदक विजेता भारताची सायना नेहवाल देखील मलेशिया ओपनच्या पहिल्या राउंडमध्ये पराभूत होऊन बाहेर झाली होती, पण तिच्या रँकिंगमध्ये कुठलेही फेरबदल झाले नाही आणि ती नवव्या क्रमांकावर कायम आहे. पुरुष सिंगल्समध्ये  अजय जयराम 14व्या क्रमांकासोबत भारताकडून सर्वात वरची रँक मिळवणारा शटलर आहे. सिंधू सध्या सिंगापूर सुपर सिरींजमध्ये आपल्या मोहिमेला पुढे वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

वेबदुनिया वर वाचा