भारताच्या पी. व्ही. सिंधूनं इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजचं विजेतेपद पटकावलं आहे. ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा कडवा संघर्ष मोडित काढून तिने हा विजय मिळवला. सिंधूने पहिल्यांदाच इंडिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.21-19, 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करुन इंडिया ओपन महिला एकेरीचं विजेतेपद सिंधूने पटकावलं. तिनं हा सामना अवघ्या 47 मिनिटांमध्ये जिंकला.