पोलंडमधील ऑर्लान जानूझ कुसोझिंस्की मेमोरियल स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जर्मनीच्या ज्युलियन वेबरच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत भारतीय खेळाडू नीरज त्याच्या लयीत दिसत नव्हता आणि त्याला त्याची सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. यामुळे त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.