स्पेनमध्ये असे काही घडत नाही. इथे सगळे वेगळे आहे. मी सुवर्ण जिंकले तर सिंधूने रौप्य. मात्र, मला हे ऐकून आश्चर्य वाटले की तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव झाला. मलाही सुवर्णपदक जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून काही रक्कम मिळाली. मात्र, त्याची तुलना सिंधूच्या रकमेशी केली जाऊ शकत नाही.