शरापोव्हाला वाईल्ड कार्ड

बर्मिगहॅम- पुढील ‍महिन्यात येथे होणार्‍या बर्मिगहॅम एॅगॉन क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियन महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचे ठरविले आहे.
 
उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यानंतर शरापोव्हावर 15 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. या बंदीचा कालावधी संपल्यानंतर तिने गेल्या महिन्यात पुन्हा ‍टेनिस क्षेत्रात पुनरागमन केले. 17 ते 25 जून दरम्यान एजबेस्टन प्रिओरि क्लबच्या ग्रासकोर्टवर एॅगॉन क्लासिक महिलांची टेनिस स्पर्धा आयोजित केली आहे. 3 जुलैपासून लंडनमध्ये सुरू होणार्‍या विंबल्डन ग्रॅड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.

वेबदुनिया वर वाचा