शारापोव्हाचे आव्हान समाप्त

मंगळवार, 2 मे 2017 (09:38 IST)
स्टुटगार्ट- येथे सुरू असलेल्या स्टुटगार्ड खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या ख्रिस्टीना मॅलेडेनोव्हिकने रशियाच्या मारिया शारापोव्हाचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त केले. मॅलेडेनोव्हिकने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून जेतेपदासाठी आता मॅलेडेनोव्हिक आणि सिमगंड यांच्यात लढत होईल.
 
उपांत्य सामन्यात मॅलेडेनोव्हिकने शारापोव्हाचा 3-6, 7-5, 6-4, अशा सेटस्मध्ये पराभव केला. मॅलेडेनोव्हिकनेही लढत तब्बल अडीच तासानंतर जिंकली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात सिगमंडने रूमानियाच्या हॅलेपवर 6-4, 7-5 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

वेबदुनिया वर वाचा