महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा साताऱ्यात होणार, आखाड्यात रंगणार 'महाराष्ट्र केसरी' थरार

मंगळवार, 5 एप्रिल 2022 (20:10 IST)
कोरोनामुळे जग थांबले होते. पण आता दोन वर्षानंतर गाडी रुळावर बसत आहे. आणि कोरोनाचे सर्व निर्बंध कोरोनाची लाट ओसरल्यामुळे काढण्यात आले आहे. आणि पुन्हा जीवन चलायमान झाले आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध काढून घेतल्यामुळे यंदा सर्व सण आणि उत्सव उत्साहात साजरे करण्यात येत आहे. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील होणार असून यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमान पद साताऱ्याला मिळालं आहे. या स्पर्धेचे आयोजन 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत होणार आहे. 
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हत.यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध काढून घेतल्यावर महाराष्ट्र्र केसरी स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यात पैलवान भाग घेणार असून पैलवानांमध्ये उत्साह दिसून सर्व पैलवान मोठया तयारीनिशी स्पर्धेत उतरणार आहे.  
 
यंदा ही महाराष्ट्र केसरी 'किताबसाठी 64 व्या राज्य विजेतेपदासाठी होणाऱ्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन 4 ते 9 एप्रिल साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणार असून 
यंदा मानाची गदा कोण पटकावणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती