लिएंडर पेस आणि महेश भूपतीची जोडी वेब सीरिजमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे

बुधवार, 7 जुलै 2021 (16:11 IST)
भारताच्या दोन महान टेनिसपटू लिअँडर पेस आणि महेश भूपती यांनी मिळून 1999 साली विम्बल्डन मेन्स डबल्स पद जिंकले.अशी कामगिरी करणारी ही भारताची पहिली जोडी होती. नंतर या दोघांमध्ये काही मतभेद झाले, त्यानंतर दोघांनीही एकत्र खेळणे बंद केले.आता पुन्हा एकदा पेस आणि भूपती एकत्र दिसतील,परंतु टेनिस कोर्टवर नव्हे तर टीव्ही पडद्यावर. पेस आणि भूपती एका नवीन वेब सीरिजमध्ये काम करणार आहेत ज्यात जगातील पहिल्या क्रमांकाची जोडी असणाऱ्या या खेळाडूंच्या अवांछित बाबी आणि प्रवासाची मजेदार किस्से बघायला मिळतील.
 
पेस आणि भूपती आपला प्रवास आणि परस्पर संबंध सांगताना दिसतील. अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी या प्रसिद्ध दिग्दर्शक जोडीने या वेबसिरीजची निर्मिती केली आहे.1999 मध्ये विम्बल्डन दुहेरीत विजेतेपद मिळविणारी पेस आणि भूपती ही पहिली भारतीय जोडी होती.या दोघांची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती.रविवारी पेसने विंबलडनच्या पहिल्या पुरुष डबल्स च्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त ट्विटरवर दोघांचे चित्र पोस्ट केल्यावर दोघ एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यांनी लिहिले, 'दोन मुलांचे स्वप्न देशाचे नाव उज्ज्वळ करण्याचे होते.'
 
यावर भूपतींनी उत्तर दिले, 'तो क्षण खास होता. असं आपल्याला वाटतं की दुसरा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे.' इंडियन एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जोडीने 1994 ते 2006 या काळात एकत्र खेळले. यानंतर, ते 2008 आणि 2011 दरम्यान पुन्हा एकत्र आले. या दोघांमधील झालेले मतभेद देखील सार्वजनिक झाले परंतु आता ते त्याही पलीकडे गेले आहेत.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती