महिला एकेरीच्या पहिलया उपांत्य लढतीत दीपिकाने सनसनाटी विजय मिळवला. चौथ्या मानांकित दीपिकाने अग्रमानांकित अॅनी अयूवर 11-9, 7-11, 11-9 असा विजय मिळवला, तर दुसर्या उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित चिनप्पाने सहाव्या मानांकित टाँग त्स थिंगवर 11-6, 11-4, 11-8 असा विजय मिळवला.
दीपिकाने जागतिक क्रमावरीत अकाराव्या स्थानावर असणार्या अॅनीविरूद्ध जबरदस्त कामगिरी केली. तिने 50 मिनिटांत अॅनीचे आव्हान परतवून लावले. पहिल्या गेममध्ये दीपिकाने वर्चस्व राखले. ही गेम जिंकून दीपिकाने आश्वासक सुरूवात केली. यानंतर अॅनीने दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली. यानंतर मात्र, दीपिकाने तिला वर्चस्व मिळू दिले नाही. दीपिकाने आक्रमक खेळ केला.
दुसरीकडे जोश्नाने हाँगकाँगच्या विंगला फारशी संधीच दिली नाही. पहिल्या दोन गेम तिने सहज जिंकल्या. तिसर्या गेममध्ये विंगने आव्हान राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण जोश्नाने हात-तोंडाशी आलेला विजय हुकणार नाही, याची काळजी घेतली.