भारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात

सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:50 IST)
चीनचा धुब्बा उडवत भारतीय महिला हॉकी संघाने २०१७ च्या महिला आशिया करंडकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ भारतीय महिला हॉकी संघाने देखील स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यात चीनला पेनल्टी शूटआउटमध्ये ५-४ अशा गुणांनी मात देत भारतीय संघाने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच या विजयासह आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी देखील भारत पात्र ठरला असून स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची देखील निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाबरोबरच देशातील सर्व हॉकीप्रेमींमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
जपानच्या काकामिगहारा कावासाकी मैदानावर हा सामना सुरु होता. दोन्ही संघ एकमेकांना तुल्यबळ असल्यामुळे हा सामना अत्यंत मनोरंजक आणि अटीतटीचा झाला. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोघांपैकी एकाही संघाला एक गोल करता आला नव्हता. पहिल्या दोन्ही क्वार्टर दोन्ही संघांनी आपल्या सर्व उत्तम खेळीचे प्रदर्शन केले, परंतु एकाही खेळाडूला गोल करण्यात यश आले नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती