भारताचा 18 ग्रँडस्लॅम विजेता सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू लीएंडर पेसने निवृत्तीचे संकेत दिले. आगामी 2020 हे वर्ष आपल्या कारकिर्दीतील अखेरचे वर्ष असलचे त्याने जाहीर केले. 46 वर्षीय पेससाठी 2019 हे वर्ष आव्हानात्क ठरले. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत सर्वाधिक 44 सामने जिंकणार्या पेसला 19 वर्षांत प्रथमच क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंच्या खाली घसरण झाली.
'आंतरराष्ट्रीय टेनिसपटू म्हणून 2020 हे माझ्या कारकिर्दीतील अंतिम वर्ष असेल,' असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत पेसने 'ट्विटरवर' पोस्ट केले. 'आगामी वर्षांत मी ठरावीकच स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून या स्पर्धामध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन,' असेही पेसने सांगितले. 'माझ्या आई-वडिलांनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्यामुळे मी त्यांचा ऋणी राहीन. तंच्याशिवाय मी इथवर मजल मारू शकलो नसतो,' असे पेस पुढे म्हणाला.