सात्विक-चिराग उपांत्य फेरीत पोहोचले

शनिवार, 18 जानेवारी 2025 (13:50 IST)
इंडिया ओपन 2025: सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी नवी दिल्ली येथे शानदार कामगिरी करत इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि कांग मिन-ह्युक यांचा 21-10, 21-17 असा पराभव केला.
 
भारतीय पुरुष दुहेरी जोडीने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ दाखवला आणि 21-10 अशा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. त्याचवेळी दुसऱ्या गेममध्येही 7व्या मानांकित भारतीय जोडीने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत दुसरा गेम 21-17 असा जिंकला.
ALSO READ: इंडिया ओपन बॅडमिंटन: सर्वात मोठा भारतीय संघ इंडिया ओपनमध्ये दाखल होणार
त्याचवेळी पीव्ही सिंधू आणि किरण जॉर्ज आपापल्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडले. या दोन खेळाडूंच्या पराभवामुळे भारताचे एकेरी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला महिला एकेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंगकडून 9-21, 21-19, 17-21 असा पराभव पत्करावा लागला, तर पुरुष एकेरीत किरण जॉर्जला चीनच्या वेंग होंग यांगकडून 13-21, 19-21  असा सरळ पराभव पत्करावा लागला 
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती