यजमान ब्राझीलच्या विजयी किकने 20 व्या फीफा वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ झाला. ब्राझीलने आपल्यापेक्षा दुबळ्या क्रोएशियाचा 3-1 असा धुव्वा उडवला. स्टार खेळाडू नेमारने जबरदस्त दोन गोल करून आपल्या संघाला मोलाचे योगदान दिले. नेमारच सामन्याचा हिरो ठरला. तसेच ऑस्करने एक गोल केला.
फॉर्ममध्ये आले नेमार
ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारच्या गोलने अन्य खेळाडूंची झोप उडवली. नेमारने हाफच्या 29 व्या मिनिटाला गोल केला. या प्रकारे ब्राझीलने क्रोशियाची 1-1 अशी बरोबरी केली.त्यांने दुसरा गोल हा पेनल्टी शूटमधून केला. ब्राझीलचा दुसरा खेळाडू ऑस्कर याने तिसरा गोल केला आणि ब्राझीलला यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.