Champions League: बार्सिलोनाचा पराभव,संघ सलग दुसऱ्या सत्रात चॅम्पियन्स लीगच्या गट फेरीतून बाहेर

शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (09:21 IST)
स्पेनचे बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिद हे दोन संघ चॅम्पियन्स लीगमधून बाद झाले आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवता आला नाही. पाच वेळचा चॅम्पियन बार्सिलोनाचा जर्मन क्लब बायर्न म्युनिचकडून 3-0 असा पराभव केला. या पराभवानंतर संघ सलग दुसऱ्या सत्रात चॅम्पियन्स लीगच्या गट फेरीतून बाहेर पडला. त्याला पुन्हा युरोपा लीगमध्ये खेळावे लागणार आहे. लिओनेल मेस्सी या सर्वकालीन महान फुटबॉलपटूंपैकी एक गेल्यानंतर सलग दुसऱ्या सत्रात चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीपर्यंत पोहोचण्यात संघ अपयशी ठरला.

बार्सिलोनाच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर एकही गोल करता आला नाही. बायर्न म्युनिचमधून बार्सिलोनाच्या संघात दाखल झालेला पोलंडचा स्टार स्ट्रायकर लेवांडोस्की पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघाविरुद्ध अपयशी ठरला. बायर्नसाठी साडिओ मानेने दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 31व्या मिनिटाला एरिक मॅक्सिमने दुसरा गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यापूर्वी बेंजामिन पावार्डने दुखापतीच्या वेळेत (90+5व्या मिनिटाला) तिसरा गोल करून बार्सिलोनाला बाद केले.
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती