भारताचा दिग्गज बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. शनिवारी (26 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत थायलंडच्या कुनलावत विटिडसर्नविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत त्याचा पराभव झाला. या पराभवानंतर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कुनलावत विटिडसर्नने प्रणॉयचा 18-21, 21-13, 21-14 असा तीन गेमच्या लढतीत पराभव केला. प्रणॉयला पहिल्यांदाच जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्यात यश आले आहे.
31 वर्षाच्या प्रणय ला आपल्या कारकिर्दीमध्ये बाजी मारताही आली नाही. दोन्ही खेळाडू दोनदा आमनेसामने आले आहेत आणि सर्वांमध्ये कुणालवत विजयी झाला आहे. तत्पूर्वी, प्रणॉयने शुक्रवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनला पराभूत करून मोठा अपसेट केला होता.
पहिल्या गेममध्ये त्याने थायलंडच्या खेळाडूला टिकू दिले नाही. प्रणॉयने पहिला गेम 21-18 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये त्यांनी चांगली सुरुवात केली पण काही वेळातच त्यांची गती गमावली. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. याचा फायदा घेत विटीडसर्नने दुसरा गेम 21-13 असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्येही प्रणॉयला आव्हान देता आले नाही आणि तो सामना गमावला.
प्रणय विश्व चॅम्पियन शिप मध्ये पदक जिंकणारे पुरुष एकल खेळाडू बनले आहेत. यापूर्वी पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत (रौप्य), लक्ष्य सेन (कांस्य), बी साई प्रणीत (कांस्य) आणि प्रकाश पदुकोण (कांस्य) यांनी पदके जिंकली आहेत.