भारताची दिग्गज शटलर पीव्ही सिंधूला बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत बाय देण्यात आला आहे, तर किदाम्बी श्रीकांत जपानच्या केंटा निशिमोटोविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. द्वितीय मानांकित आणि गेल्या आवृत्तीतील कांस्यपदक विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनाही बाय मिळाले आहेत. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या पुरुष दुहेरी जोडीचा दुसऱ्या फेरीत आयर्लंडचा जोशुआ मॅगी-पॉल रेनॉल्ड्स किंवा ऑस्ट्रेलियाचा केनेथ झे हुई चु-मिंग चुएन लिम यांच्याशी सामना होईल.
16वी मानांकित सिंधू दुसऱ्या फेरीत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल जिथे तिचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा किंवा व्हिएतनामच्या थुई लिन्ह गुयेनशी होईल. एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत हे भारताचे स्टार त्रिकूट पुरुष एकेरीत देशाचे प्रतिनिधित्व करतील. पहिल्या फेरीत नवव्या मानांकित प्रणॉयची फिनलंडच्या काले कोल्जोनेनशी, तर11व्या मानांकित लक्ष्यची लढत मॉरिशसच्या जॉर्जेस ज्युलियन पॉलशी होईल.