बुडापेस्ट विश्वचषक ही ऑलिम्पिक क्वालिफायिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेत चेन्नईच्या २७ वर्षीय भवानीने रविवारी शानदार प्रदर्शन करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली. भवानीच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. आशिया ओशनिया समूहामध्ये ऑलिम्पिकच्या दोन जागा होत्या. जपानच्या तलवारदाराला पहिली जागा मिळाली तर, दुसरी जागा भवानीला मिळाली, असे फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस बशीर अहमद खान यांनी सांगितले आहे.