शाळेत सुविधा आवश्यक: बबिता फोगट

सोमवार, 6 मार्च 2017 (10:09 IST)
भोपाळ- सिनेस्टार आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला मल्ल बबिता फोगाट हिने देशात महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाव व शालेय स्तरावरून विध्यार्थ्यांच्या जीवनाला सुरूवात होत असते, असे बबिताने म्हटले आहे.
 
महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गाव शालेय पातळीवर राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कुस्तीचा स्पर्धात्मक माहौल निर्माण केला, तर या खेळात चांगले निकाल मिळू शकतात. जर कुठल्या संस्थेची किंवा सरकारची मदत मिळाली, तर कुस्ती अकादमी सुरू करण्याची इच्छा आहे, अशी बबिता म्हणाली.

वेबदुनिया वर वाचा