अभिनव बिंद्रांच्या बायोपिकसाठी पिता-पुत्र एकत्र?

शनिवार, 3 जून 2017 (12:49 IST)
आता मोठ्या पडद्यावर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांचे आयुष्य पाहायला मिळणार आहे. कारण लवकरच अभिनव बिंद्रा यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची निर्मिती होणार आहे. 
 
या चित्रपटात अभिनव बिंद्रा यांची भूमिका दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिर्झिया चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारा हर्षवर्धन कपूर साकारणार आहे. तर अभिनव यांच्या वडिलांची भूमिका अभिनेता अनिल कपूर साकारणार आहे. म्हणजे रिअल लाईफमधील पिता-पुत्राची जोडी आता रील लाईफमध्ये पिता पुत्राची भूमिका साकारणार आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पिता-पुत्र अनिल कपूर व हर्षवर्धन कपूरने साइन केला आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी अनिल कपूर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, या चित्रपटाबाबत सद्या कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

वेबदुनिया वर वाचा