भुवनेश्वर कॅम्पसाठी भारतीय फ़ुटबाँल संघाच्या 15 संभाव्य खेळाडूंची घोषणा

बुधवार, 8 मे 2024 (19:30 IST)
फिफा विश्वचषक 2026 च्या प्राथमिक संयुक्त पात्रता दुस-या फेरीतील कुवेत आणि कतारविरुद्धच्या सामन्यांसाठी 15 संभाव्य खेळाडूंची दुसरी यादी भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी जाहीर केली.या पूर्वी त्यांनी शनिवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत समाविष्ट असलेले 26 खेळाडू भुवनेश्वरमध्ये 10 मेपासून सराव सुरू करतील.
 
आयएसएल कप फायनलमध्ये खेळलेल्या मुंबई सिटी एफसी आणि मोहन बागान एसजीच्या 15 खेळाडूंचा समावेश दुसऱ्या यादीत करण्यात आला आहे. 
राष्ट्रीय शिबिरात एकूण 41 खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताचा सामना 6 जूनला कोलकात्यात कुवेत आणि 11 जूनला कतारमध्ये होणार आहे.
 
भारत अ गटात चार सामन्यांतून चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून गटातील अव्वल दोन संघ तिसऱ्या फेरीत प्रवेश करतील आणि एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
 
संभाव्य खेळाडूंची यादी:
गोलरक्षक: पी टेम्पा लचेनपा, विशाल कैथ बचावपटू: आकाश मिश्रा, अन्वर अली, मेहताब सिंग, राहुल भेके, शुभाशिष बोस, मिडफिल्डर: अनिरुद्ध थापा, दीपक तांगडी, लालेंगमाविया राल्टे, लालियांझुआला छांगटे, लिस्टन कोलासो, सहल अब्दुल समद.

Edited By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती