‘फिफा’लाही फिक्सिंगचा कलंक?

गुरूवार, 28 मे 2015 (10:38 IST)
‘फिफा’ या जगप्रसिध्द फुटबॉल स्पर्धेलाही फिक्सिंगचा कलंक लागल्याची माहिती पुढे येत आहे. कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याच्या संशयावरुन  फिफाच्या सात फुटबॉल अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दहा कोटींपेक्षा अधिक डॉलर रकमेची लाच स्वीकारल्याचा या सर्वांवर संशय आहे.  १९९० च्या दशकापासून झालेल्या स्पर्धांबाबत लाच स्वीकारून माहिती पुरविल्याचा सात अधिकार्‍यांवरआरोप ठेवण्यात आला आहे.  राफेल एसक्विवेल, कोस्टा तकास, जेफ्री वेब, एडवर्डाे ली, युगेनियो फिगुएरेडो, ज्युलिओ रोचा, जोस मारिया मारिन या अधिकाºयांना सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान या कारवाईबद्दल सध्या तरी कोणतीही माहिती देता येणार नाही, असे फिफाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा