हाँगकाँग ओपनवर सायनाची नजर

बुधवार, 18 नोव्हेंबर 2015 (11:23 IST)
हाँगकाँग- चायना ओपनमध्ये रविवारी पायाला झालेल्या दुखापतीनंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शानदार खेळ साकारत उपजेतेपद पटकावले होते. या जेतेपदानंतर हाँगकाँग ओपनच्या जेतेपदावर तिची नजर असणार आहे. 35 हजार अमेरिकन डॉलर्स बक्ष‍ीस रकमेच्या हाँगकाँग ओपन स्पर्धेला सुरुवात झाली असून यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये इंडियन ग्रांपिमध्ये जेतेपद पटकावत सायनाने शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर ऑल इंग्लंड, विश्वचॅम्पियन व चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभव पत्कारावी लागली होती. हाँगकाँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत पराभवाची मालिका खंडित करण्याची नामी संधी आहे.

वेबदुनिया वर वाचा