सेमीफायनलमध्ये सानिया-भूपती जोडीचा पराभव

वेबदुनिया

शुक्रवार, 27 जानेवारी 2012 (14:10 IST)
ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेतील संमिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेची बिथेनी मॅटक-सॅण्ड आणि रोमानियाचा होरिया टिकाऊ यांनी सानिया मिर्झा आणि महेश भूपतींचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

मात्र भारताचा टेनिसपटू लियांडर पेस आणि त्याचा साथीदार लॅडीक स्टेपनीक यांना पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत स्थान पटकाविण्यात यश आले आहे. त्यामुळे पदक मिळविण्याच्या भारताच्या आशा कायम आहेत. पेस आणि इलिना व्हेसलिना ही जोडी संमिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत रॉबर्टा व्हिन्सी आणि डॅनिअल ब्राचिली यांच्याशी लढणार आहे.


वेबदुनिया वर वाचा