सानिया मिर्झा आणि एलेना वेस्नीना ही जोडी कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्या फेरीतच गारद झाली. त्यांना वेरा दुशेविना आणि शहर पीर या जोडीने 4-6, 4-6 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
सुमारे सव्वातास चाललेल्या या सामन्यात सानिया आणि वेस्नीना जोडीला सूचर गवसला नाही. त्यामुळे त्यांना सहज पराभव पत्करावा लागला.