सानिया मिर्झा डब्ल्यूटीएच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी

सोमवार, 7 जुलै 2014 (17:31 IST)
भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने विम्‍बल्‍डन स्पर्धेतील शानदार कामगिरीच्या बळावर डब्ल्यूटीए (WTA) दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्‍या स्थानावर धडक दिली आहे. सानियाने तब्बल 11 वर्षांनंतर हे यश संपादन केले आहे. आतापर्यंतच्‍या करिअरमधील तिचे हे सर्वोत्तम रॅकिंग आहे.

सानियाने यापूर्वी 2003मध्‍ये झिम्बाब्वेची आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत विम्‍बल्‍डनच्‍या दुसर्‍या फेरीपर्यंत मजल मारली होती. 130 पॉइंटनुसार ती पाचव्‍या स्‍थानी पोहोचली आहे.  नुकतीच टेनिसची क्रमवारी जाहीर करण्यात आली.

आपल्या मनगटाला झालेल्‍या दुखापतीतून सावरण्‍यासाठी मला खूप वेळ लागला. तीन सर्जरीनंतर मेहनतीच्‍या जोरावर मला हे स्‍थान मिळाल्याने खूप आनंदी असल्याचे सानिया मिर्झाने सांगितले.  

वेबदुनिया वर वाचा