क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाला पॅरालिम्पिक अॅथलीट एच. एन. गिरीशाने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याच निर्णय घेतला होता. मात्र लंडन 2012 पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणार्या गिरीशाने आपणच या पुरस्कारासाठी योग्य असल्याचे सांगून न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.