सानिया-मार्टिना अंतिम फेरीत

गुरूवार, 28 जानेवारी 2016 (10:42 IST)
महिला दुहेरीतील अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांनी सलग 35 वा सामना जिंकत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसची अंतिम फेरी गाठली. 
 
सानिया-मार्टिना या इंडो-स्वीस जोडीने 13व मानांकित जुलिया जॉर्जेस-करोलिना पलिसकोव्हा या जर्मन-झेक जोडीचा 6-1, 6-0 असा अवघ 54 मिनिटात पराभव केला. सानिया पहिलंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीच अंतिम फेरीत पोहोचली आहे.

वेबदुनिया वर वाचा