वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये सायनाचा पराभव

वेबदुनिया

सोमवार, 19 डिसेंबर 2011 (12:42 IST)
ND
वर्ल्ड सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायनाला जागतिक क्रमवारीतील नंबर वनची खेळाडू वांग यिहान हिने 18-21, 21-13, 21-13 ने पराभूत केले. चीनच्या खेळाडूंनी स्पर्धेतील पाच गटांचे विजेतेपद पटकावले हे विशेष.

जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाची खेळाडू सायना नेहवालने महिला एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या वांग हिला 1 तास आणि 12 मिनिटे झुंज दिली. मात्र ती पराभव टाळू शकली नाही. दोन्ही खेळाडूंदरम्यान ही चौथी लढत होती. चारही वेळेस वांगनेच बाजी मारली.

वेबदुनिया वर वाचा