आयपीएलमध्ये नवोदित क्रिकेटपटूंनी करोडो रुपये कमावलेत, मात्र पहिल्या प्रो-कुस्ती लीगच्या लिलावात ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार आणि योगेश्व दत्तची लाखोंमध्ये बोलवणं करण्यात आली. या लिलवात दोन वेळचा ऑलिंपिक पदकविजेता सुशील कुमारपेक्षा (38.20 लाख) ऑलिंपिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तला (39.70 लाख) सर्वाधिक बोली लागली.
योगेश्वर आणि सुशीलची आधारभूत किंमत केवळ 33 लाख इतकी होती. आयकॉन असूनही सुशीलला हमी भावापेक्षा केवळ 5.20 तसेच योगेश्वरला 6.70 लाख अधिक मोजण्यात आले. दोघांनाही हरयाणा फ्रँचायझीने करारबद्ध केले. सर्वाधिक बोली लागणार्यांमध्ये तिसर्या स्थानी युवा कुस्तीपटू नरसिंग यादव आहे. त्याला बंगळूरू फ्रँचायझीने 34.50 लाखांना करारबद्ध केले.