मिशन ऑलिम्पिक..

वेबदुनिया

सोमवार, 27 फेब्रुवारी 2012 (12:43 IST)
WD
ऑलिम्पिक पात्रता फेरीत अजिंक्य ठरल्यानंतर आता भारतीय संघाची जबाबदारी आणखी वाढली आहे. याच दणाकेबाज कामगिरीची मालिका पुढे कायम ठेवत भारतीय संघाला लंडनमध्ये मिशन ऑलिम्पिकही फत्ते करावे लागणार आहे.

फ्रान्सविरुद्ध लढतीतभारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारतीय फॉरवर्ड्सचे हल्ले रोखताना फ्रान्सच्या बचावफळीच्या नाकी नऊ आले होते. उत्तरार्धात, या हल्लयाची तीव्रता अधिक वाढली. यामुळे फ्रान्सचे खेळाडू अक्षरश: घायकुतीला आले. याचा परिणाम म्हणून ४५व्या मिनिटाला पाहुण्यांच्या बचावपटूने वीरेन लाक्राला स्टिक मारली. मात्र, भारतीय खेळाडूंनी हे प्रकरण वाढवले नाही. सामन्यात फ्रान्सने दोनदा तर भारताने एकदा रेफरल मागितला. यापैकी केवळ एक निर्णय फ्रान्सच्या बाजूने गेला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा रेफरल मागितला. यात भारतानेच बाजी मारली.

भारतीयांनी प्रारंभ आक्रमक पद्धतीने केला. याचा परिणाम म्हणून तिसर्‍याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, संदीपने मारलेला फटका गोलपोस्टमध्ये धडकण्याआधीच फ्रान्सचा डिफेंडर फ्रान्कोईस शिफरने चेंडू बाहेर काढला. यावेळी शिफरने तर जणू गोल केल्याच्या थाटात जल्लोष केला. पहिल्या 10 मिनिटांत 6 वेळा भारतीय खेळाडूंनी फ्रान्सच्या गोलपोस्टपर्यंत धडक मारली.

वेबदुनिया वर वाचा