भारतीय कुस्तीगीर कोठेही कमी पडणार नाही

शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (12:00 IST)
राष्ट्रकुल सुरू होण्याआधीच देशाचे चार पहिलवान डोपिगमध्ये अडकल्याची घटना खेदपूर्ण असल्याचे सांगत भारतीय कुस्ती फेडरेशनचे सरचिटणीस करतार सिग यांनी संघाच्या कामगिरीवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही असा आशावाद व्यक्त केला.

भारतीय कुस्तीच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडतेयं, यामुळे कुस्तीची बरीच बदनामी झाली आहे. मात्र कामगिरीची जेव्हा वेळ येईल, तेव्हा भारतीय कुस्तीगीर कोठेही कमी पडणार नाही. कुस्तीची झालेली अप्रतिष्ठा भरून काढण्यासाठी आता सर्वोत्तम कामगिरी करून दाखविण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे. यंदा 21सुवर्णपदकांवर भारताचा डोळा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा