भारताचे दोन संघ खेळणार लंडन ऑलिंपिकमध्ये

WD
अखिल भारतीय टेनिस महासंघटनेचे (एआयटीए) अध्यक्ष अनिल खन्ना यांनी स्पष्ट केले की खेळाडूंमधील वादामुळे लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून टेनिसमध्ये दुहेरीत दोन संघ खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महेश भूपती आणि लिअँडर पेस यांच्यातील वादामुळे दुहेरीत नक्की कोण खेळणार याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर यावर आज (गुरुवार) पडदा पडला. टेनिस संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे दुहेरीत दोन संघ खेळणार आहेत. यामध्ये एका संघात महेश भूपती आणि रोहन बोपण्णा असतील, तर दुसऱ्या संघात लिअँडर पेस आणि विष्णू वर्धन हे दोघेजण असतील. याबरोबरच मिश्र दुहेरीच्या संघात सानिया मिर्झाचा जोडीदार लिअँडर पेस असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा