फेडररला रॉटरडॅमचे अव्वल मानांकन

वेबदुनिया

सोमवार, 13 फेब्रुवारी 2012 (12:33 IST)
जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेला स्वीत्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर पुन्हा एटीपी रॉटरडॅम टेनिस स्पर्धेत खेळणार असून, यंदाच्या स्पर्धेसाठी त्याा पुरुष एकेरीचे अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

फेडरर या स्पर्धेत 2005ला विजेतेपद पटकावल्यापासून खेळलेला नाही, परंतु सात वर्षांनंतर तो पुन्हा या स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्पर्धेचे संचालक आणि माजी विम्बल्डन विजेते रिचर्ड क्रॅजीसेक हे फेडररचे चांगले मित्र असून आजपासून सुरू होणार्‍या या इंडोर स्पर्धेच्या वेळापत्रकात त्यांनी विशेष फेरबदल केला आहे. टॉमस बर्डिचला या स्पर्धेचे दुसरे मानांकन देण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा