पेस-वेस्निनाचे विजेतेपद हुकले

वेबदुनिया

सोमवार, 30 जानेवारी 2012 (12:01 IST)
WD
कारकिर्दीत दुसर्‍यांना दुहेरी मुकुटाच्या जवळ पोहोचलेल्या भारताच्या लिएंडर पेसला मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पेस आणि रशियाच्या एलिना वेस्निना या जोडीला होरिया टेकाऊ आणि बेथेन मॅटेक या जोडीने सरळसेटमध्ये पराभूत केले.

लिएंडर पेसने शनिवारी पुरुषांच्या दुहेरीत झेक प्रजासत्ताकच्या रॅडेक स्टेपनॅक याच्यासह विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर रविवारी त्याने मिश्र ‍दुहेरीचा अंतिम सामना खेळला. मात्र तिसर्‍या मानांकित पेस-वेस्निना जोडीला आठव्या मानांकित टेकाऊ-मेटॅक जोडीने 3-6, 5-7 असे पराभूत केले.

वेबदुनिया वर वाचा