पेस-भूपतीचा उपांत्य फेरीत पराभव

वेबदुनिया

सोमवार, 28 नोव्हेंबर 2011 (13:27 IST)
अव्वल मानांकित ब्रायन बंधूंवर अवघ्या तासाभरात धडाकेबाज विजय मिळवून दिमाखात एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या पेस-भूपती या भारतीय जोडीला पोलंलडच्या मारियुझ फियर्सटेनबर्ग आणि मार्सिन मात्कोवस्कीया जोडीने 4-6, 6-4, 6-10 असे सुपर ट्रायब्रेकरमध्ये पराभूत केले.

आठव्या मानांकित फियर्सटेनबर्ग आणि मात्कोवस्की जोडीची आता अंतिम फेरीत त्यांची लढत बेलारुसच्या मॅक्स मिर्नयी आणि कॅनडाच्या डॅनियल नॅस्टोर या तिसर्‍या मानांकित जोडीशी होणार आहे. त्यांनी दुसर्‍या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या अव्वल मानांकित ब्रायन बंधूंचा पराभव केला.

वेबदुनिया वर वाचा