ब्रिटनचा चौथा विश्वमानांकित टेनिसपटू अँडी मरे याने दुबई टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या मायकेल बेरर याला 6-3, 4-6, 6-4 असे पराभूत केले. दुसर्या फेरीत मरेची लढत स्वित्झर्लंडच्या मार्को चिउडिनेली याच्याशी होणार आहे.
मार्कोने पहिल्या फेरीत रशियाच्या निकोले डेवीडेंको याला 6-4, 5-7, 6-4 असे पराभूत केले.