डेल पोट्रो, रॉडीकचे आगेकूच!

वेबदुनिया

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2011 (12:50 IST)
अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो, अमेरिकेचा अँडी रॉडीक यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. मरियन बार्तोलीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. डेल पोट्रोने फिलीप्पो व्होलॅंड्रीवर मात केली. अँडी रॉडीकला देशबांधव मायकेल रसेलविरुद्ध एक सेट गमवावा लागला.

दरम्यान, रॉबिन सॉडर्लिंग आणि व्हिनस विल्यम्स यांना आजारपणामुळे माघार घ्यावी लागली. सायप्रसच्या मार्कोस बघदातीसचे आव्हान संपुष्टात आले. झंझावाती सर्व्हिस करणाऱ्या जॉन इस्नरकडून तो पराभूत झाला.

वेबदुनिया वर वाचा